मायमराठीचा अनमोल ठेवा असं ज्याचं वर्णन करता येईल, असा मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला होता. त्याला आता सुमारे ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. का. र. मित्र यांनी प्रसिद्ध केलेल्या या अंकाला मराठीतील पहिला दिवाळी विशेषांक अशीही जनमान्यता आहे. हा अंक अनेक अर्थांनी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे तत्कालीन दर्शन घडविणारा ऐतिहासिक व अनमोल असा खजिनाच आहे. मराठी साहित्याला नवे परिमाण देणारे समृद्ध साहित्य वाचकांपुढे आणणारा हा अत्यंत दुर्मिळ आणि वाचनीय असा हा अंक प्रत्येक मराठी घरात वाचला जावा इतका सुंदर आहे.
बालकवी ठोंबरे यांची आनंदी आनंद गडे ही कविता सर्वप्रथम यातच प्रसिद्ध झाली होती. रॅंग्लर परांजपे, विठ्ठल रामजी शिंदे, धर्मानंद कोसंबी, न. चिं. केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, गोपाळकृष्ण गोखले अशा कितीतरी दिग्गजांचे साहित्य यात सामावलेले आहे. त्या काळात अत्यंत परिश्रमातून साकारलेला हा अंक केवळ साहित्याच्याच नव्हे तर मांडणी व जाहिरातींच्या बाबतीतही आश्चर्य वाटावे इतका परिणामकारक. काळ बदलला तरी त्यातील ताजेपणा कायम आहे.
२०२५ मध्ये, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनामध्ये रसिकांना मराठीतील या संपन्न साहित्य खजिन्याचे दर्शन घडविण्यासाठी आम्ही हा अंक ग्रंथ प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिला होता. त्यास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या दिवाळीनिमित्त सर्वसामान्य रसिकांना डिजिटल स्वरुपात जतन करण्यात आलेला हा अंक पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या उपक्रमासाठी रु. २०१ इतके मूल्य निश्चित करण्यात आले असून त्यातील नफा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरिता दिवाळी भेट म्हणून देण्याचा आमचा मनोदय आहे.
एकीकडे सांस्कृतिक ठेव्याचे जतन करतानाच दुसरीकडे आपल्या सामाजिक दायित्वाचे पालन या दिवाळीच्या निमित्ताने या उपक्रमाने आम्हास दिली आहे. आपणही त्यात सहभागी होऊ शकता.
हा अंक डिजिटल स्वरुपात आमच्या ड्राइव्हवर जतन करण्यात आलेला आहे.
आपण रु. २०१ इतके उपक्रममूल्य, सोबत दिलेल्या QR Code वर पैसे जमा करा.
पेमेंट केल्याची पावती (स्क्रिनशॉट) आणि आपला Gmail ID आम्हाला व्हाट्सॲप मेसेजद्वारे पाठवा.
आमच्याकडे त्याची नोंद झाल्यानंतर आपणास हा अंक वाचनासाठीचा एक्सेस दिला जाईल. त्याची लिंक आपल्याला व्हाट्सॲप मेसेजद्वारे पाठविण्यात येईल.
हा अंक आपण आपला मोबाईल, टॅब्लेट, लॅबटॉप अशा माध्यमांतून एक्सेस करु शकता. फक्त त्यासाठी आपणाकडे Gmail हवे, ज्यावर आम्ही त्याचा एक्सेस शेअर करु शकू.
या प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास आम्हाला आपण ८२०८३४४०८८ या व्हॉटस्अप क्रमांकावर मेसेज करु शकता.
ही संधी ठराविक काळापुरतीच मर्यादित आहे, याची कृपया नोंद घ्यावी.